जिल्ह्याच्या विकासासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर विशेष भर - पालकमंत्री संजय राठोड

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-Jan-2018
Total Views |

नियोजन भवन, विश्राम भवन इमारतींचे उद्घाटन

 
 
 
वाशिम : शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानासारख्या विविध योजनांची जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करून जिल्ह्याचा विकास साधण्याचा प्रयत्न सुरु आहे. तसेच जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी पायाभूत सुविधा निर्मितीवर विशेष भर दिला जात असल्याचे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांनी केले.
 
नियोजन भवन व नवीन विश्राम भवन इमारतीच्या उद्घाटनानिमित्त जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महाराष्ट्र विधीमंडळाच्या पंचायती राज समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर पारवे, जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, पंचायती राज समितीचे सदस्य आमदार चरण वाघमारे, आमदार भरत गोगावले, आमदार वीरेंद्र जगताप, जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ गाडेकर आदी उपस्थित होते.
 
पालकमंत्री राठोड म्हणाले की, वाशिम जिल्ह्यात विविध प्रशासकीय इमारती उभारणीच्या कामाला शासनाने प्राधान्य दिले आहे. यापैकी नियोजन भवन व नवीन विश्राम भवन इमारतीचे आज उद्घाटन होत आहे. या दोन्ही इमारती जिल्ह्याच्या वैभवात भर टाकणार आहेत. जिल्हा नियोजन समिती ही जिल्ह्याच्या विकासाला दिशा देण्याचे काम करते. नियोजन भवनाच्या निर्मितीमुळे या समितीच्या कामकाजाला गती मिळणार आहे. जिल्ह्याची निर्मिती झाल्यापासून शासन-प्रशासनातील अनेक अतिमहत्त्वाच्या लोकांचे वाशिमला येणे-जाणे सुरु झाले आहे. मात्र विश्राम गृहाची पुरेशी व्यवस्था नसल्याने अनेकदा अडचणी निर्माण होत होत्या. मात्र आता नवीन विश्राम भवन झाल्याने ही समस्या सुटणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले. तसेच या दोन्ही इमारतींची उभारणी अतिशय नियोजनबद्धपणे केल्याबद्दल पालकमंत्री ना. राठोड यांनी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. शासन व प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केले जात असून यामध्ये सर्वांचे सहकार्य आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
 
यावेळी आमदार सुधीर पारवे आणि जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ गाडेकर यांनी प्रास्ताविक केले. जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी यांनी मानले.
 

पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते अधिकारी, अभियंत्यांचा सत्कार
नियोजन भवन व नवीन विश्राम भवन इमारतीच्या उभारणीत विशेष योगदान देणारे जिल्हा नियोजन अधिकारी सुरेंद्र गवळी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता काशिनाथ गाडेकर, उपअभियंता विजय चेके, सहाय्यक अभियंता सतीश नांदगावकर, पूजा रावले, कंत्राटदार व्ही. बी. जाधव, एम. आर. व्यवहारे यांचा यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
@@AUTHORINFO_V1@@