भंडारा जिल्ह्यात सायबर सुरक्षा कार्यशाळेचे आयोजन

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
भंडारा: भंडारा जिल्हा पोलीस विभाग व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने १७ जानेवारी २०१८ रोजी दुपारी १२ वाजता सायबर सुरक्षा या विषयावर मिटींग हॉल पोलीस मुख्यालय, भंडारा या ठिकाणी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. या कार्यशाळेत सायबर सुरक्षा या विषयावर मार्गदर्शन देण्यात येणार आहे.
 
या कार्यशाळेत नागपूर येथील सायबर सुरक्षातज्ञ अभिषेक माहूरे व आयसीआयसीआय बँकेचे व्यवस्थापक कमलेश वालदे सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यशाळेत सायबर सुरक्षेसंबंधी तसेच सायबर गुन्हयांसंबंधी माहिती देण्यात येणार आहे. या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
 
 
वाढते सायबर गुन्हे आणि या गुन्ह्यांच्या माध्यमातून सामान्य व्यक्तीला होणारी अडचण यांच्या संबंधी या कार्यशाळेत मार्गदर्शन केले जाणार आहे. या कार्यशाळेत सगळ्यांनी उपस्थित राहण्याचे आव्हाहन केले गेले आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@