भटक्या विमुक्त समाजातील महिला बचत गटाला आर्थिक पाठबळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    16-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
जिल्हाधिकाऱ्यांनी सुपूर्द केला धनादेश

भंडारा: भिलेवाडा गावाजवळील भटक्या विमुक्त समाजातील महिला बचतगटाला स्वत:च्या व्यवसाय करता यावा यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बँक ऑफ इंडियाने १ लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य मंजूर केले असून आज जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्या हस्ते या बचत गटाला १ लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
 
 
भटके विमुकत समाज हा भंडारा जिल्हयामध्ये कितीतरी वर्षापासून या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती करीत आहे. या समाजातील लोकांनी आतापर्यंत स्थायी वास्तव्य केले आहे. या समाजातील लोकांचे स्थायी वास्तव्य नसल्यामुळे व त्यांचे कोणतेही कागदोपत्री पुरावे शासनाकडे उपलब्ध नसल्यामुळे या समाजातील लोकांना शासनाच्या विविध योजनांचा फायदा घेता आला नाही. त्यामुळे या समाजातील लोक आताही निरक्षर व अत्यंत गरीब हालाखीची परिस्थिती जगत आहे.
 
भंडारा शहराजवळी २ किलोमीटर अंतरावर राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेले भिलेवाडा या गावाजवळ भटक्या समाजातील लोक वास्तव्यासाठी आहेत. भिलेवाडा येथे वास्तव्यास येणापूर्वी या समाजातील स्त्रिया व पुरुष बहूरुपी सोंग घेवून गावा-गावामध्ये भिक मागत असत व स्वत:च्या कुटूंबाचे उदरनिर्वाह करीत असत भिलेवाडा येथे वास्तव्यास असलेल्या वस्तीमध्ये एकूण १२ कुटूंब असून १४ स्त्रिया व १६ पुरुष व लहान मुले आहेत. या वस्तीमधील अंकूश तांदुळकर यांचे पुढाकाराने या वस्तीमधील स्त्रिया व पुरुषांनी बहुरुपियांचे सोंग करुन भिक मागणे सोडून स्वत:चा व्यवसाय सुरु केलेला आहे. हा समाज लोखंडी टेबल, खुर्च्या, लोखंडी पलंग, चादरी इत्यादी तयार करुन गावोगावी विकतात व स्वत:चा उदरनिर्वाह करतात.
 
@@AUTHORINFO_V1@@