थकीत कर्जदारांनी २ टक्के सवलत घेवून कर्ज मुक्त व्हावे

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jan-2018
Total Views |
 
 
 
भंडारा: महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळ यांचे जिल्हा कार्यालय भंडारा यांचे मार्फत विविध कर्ज योजनेंतर्गत जिल्हयातील इतर मागास प्रवर्गातील स्वयंरोजगाराकरीता अल्प व्याज दराने कर्ज वितरित करण्यात आले आहे. जिल्हयातील थकीत वसूलीबाबत विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग कल्याण विभागाच्या सचिवांनी जिल्हयाचा आढावा घेतला असता एकूण ४ लक्ष इतकी थकीत रक्कम असल्याने थकीत लाभार्थी, त्यांचे जामीनदार हमीपत्र, पगारपत्र धारकांचे वेतनातून कपात, गहाणखत इत्यादीच्या आधारे दिवाणी दावे, फौजदारी खटले, महाराष्ट्र जमीन महसूल कायदा, १९६६ मधील तरतूदीनुसार आर.आर.सी इत्यादी अंतर्गत कार्यवाही करुन वसूली करण्याबाबत स्पष्ट निर्देश दिले आहे. 
 
 
 
 
महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडून कायदेशिर कार्यवाही करण्याचे काम चालू झालेले आहे. त्या अनुषंगाने भंडारा जिल्हयातील थकीत लाभार्थींना महामंडळाकडून ३१ मार्च २०१८ पर्यत थकीत व्याज रक्कमेवर २ टक्के सवलत देण्यात येणार आहे. त्याचा लाभ घेवून सर्व संबंधित लाभार्थ्यांनी थकीत मुद्दल व व्याज रक्कम एकरकमी भरणा करुन कर्ज खाते बंद करुन कर्ज मुक्त व्हावे व कायदेशिर कार्यवाही टाळावी, असे जाहिर आवाहन इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे. 
 
@@AUTHORINFO_V1@@