यवतमाळकरांना दुष्काळाची झळ बसणार नाही

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |


अमृत योजनेचे काम युद्धपातळीवर सुरु




यवतमाळ :
यावर्षी जिल्ह्यात अल्प प्रमाणात पाऊस झाल्यामुळे यवतमाळमध्ये पाण्याची समस्या भीषण होण्याची शक्यता आहे. परंतु शासने आणलेल्या अमृत योजनेचे काम सध्या युद्धपातळीवर सुरु असून यवतमाळमधील नागरिकांना दुष्काळाची झळ बसणार नाही' असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांनी दिले आहे.

अमृत योजनेअंतर्गत यवतमाळमध्ये पाण्याच्या १६ टाक्या आणि ३ उंच टाक्या बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा कालावधी सुरुवातीला ३० महिन्यांचा होता. ऑक्टोबर २०१९ पर्यंत हे काम अपेक्षित होते. मात्र यावर्षी पाणीटंचाई पाहता मार्च- एप्रिल २०१८ पर्यंत बेंबळाचे पाणी आणण्याचे नियोजन आहे. बेंबळा ते टाकळी फाटा या १९.७५ किलोमीटर पर्यंतच्या प्रस्तावित जलशुध्दीकरण प्रकल्पापर्यंत १ हजार एम.एम.(डीआय) डकटाईल आयर्न पाईप संबंधित कंत्राटदार टप्प्याटप्प्याने आणणार होते. आतापर्यंतच्या करारानुसार पाईपसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून त्यासाठी ६० टक्के रक्कम अदा केली जात होती. त्यामुळे पाईप आणण्यात अडचणी व अनियमितता होती.
ही बाब लक्षात घेऊन लवकरात लवकर पाईपचा पुरवठा झाला तर पाण्याचे नियोजन लवकर करता येईल. तसेच नागरिकांना वेळेवर पाणी उपलब्ध करून देता येईल, या उद्देशाने पालकमंत्री मदन येरावार यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिव यांना ही बाब प्राधान्याने घेण्यास सांगितले. त्यानुसार नगर विकास विभागाने आता पाईपसाठी ६० टक्के रक्कम अदा करण्याऐवजी संबंधित कंपनीला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून १०० टक्के निधी त्वरीत उपलब्ध करून दिला जाईल, असे आदेश काढले.
@@AUTHORINFO_V1@@