प्रत्येक बालकास पोलिओ डोस मिळतील याची खात्री करा - शेखर सिंग

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |
 
 
 
गडचिरोली: पल्स पोलिओ लसीकरण मोहिम अंतर्गत जिल्हयात असणारे प्रत्येक पात्र बालकास पोलिओ डोस दिले जातील याची खबरदारी आरोग्य विभागाने घ्यावी अशा सुचना जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी आज येथे दिल्या.
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात जिल्हा पल्स समन्वयक पल्स पोलिओ मोहिम बैठकीत ते बोलत होते. सन १९९५-९६ पासून आपल्या देशात पल्स पोलिओ लसीकरण मोहिम यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. चालु वर्षात दिनांक २८ जानेवारी व ११ मार्च २०१८ या दोन रविवारी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे विशेष सत्र राबविण्यात येत असून जिल्हयातील ५ वर्षाचे आतील सर्व बालकांना त्यांच्या पुर्वीच्या लसीकरण स्थितीचा विचार न करता नविन जन्म झाला असेल किंवा बालक आजारी असेल तरीही पोलिओ लसीच्या अतिरिक्त मात्रा देण्यात येणार आहेत.
 
या मोहिमेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या तयारीचा आढावा या बैठकीत आज घेण्यात आला. 
 
@@AUTHORINFO_V1@@