गायमुख यात्रा प्लास्टिक मुक्त करा -जिल्हाधिकारी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
आपत्ती व्यवस्थापन आराखडा करावा, स्वयंसेवी संस्थांचा सहभाग घ्या
 
 
भंडारा: महाशिवरात्री निमित्त तुमसर तालुक्यातील गायमुख व इतर तालुक्यात भरण्यात येत असलेल्या सर्व यात्रा प्लास्टिकमुक्त व पर्यावरणपूरक साजऱ्या करण्याच्या सूचना, जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या आहेत. यात्रेच्या निमित्ताने मोठया प्रमाणात गर्दी होत असून गर्दीचे योग्य व्यवस्थापन करण्यासाठी उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसिलदार व आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार करावा, असे त्यांनी सांगितले.
 
गायमुख यात्रेच्या नियोजनासंबंधात आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते. मांढरादेवी यात्रेमध्ये झालेल्या घटनेनंतर शासनाने यात्रा आयोजनाबाबत सविस्तर मार्गदर्शक तत्वे जारी केले असून यानुसार नियोजन करण्यात यावे, असे त्यांनी सांगितले.
 
यात्रेच्या निमित्ताने होणाऱ्या गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. पार्किंगची व्यवस्था, दुकान, नारळ फोडण्याची जागा, विज, रस्ते याबाबत सर्व संबंधितांनी प्रत्यक्ष पाहणी करुन अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या. गायमुख मंदिराचे विश्वस्त यांना व्यवस्थेबाबत लेखी सूचना दयाव्यात, असे ते म्हणाले.
 
यात्रेसाठी नियुक्त केलेल्या अधिकारी व पोलीस अधिकाऱ्यांचे आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण घेण्याच्या सूचना जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांना दिल्या. मंदिर परिसरात नारळ फोडण्याची जागा निश्चित करण्यात यावी. त्याचप्रमाणे तेल वाहणे व दिवे याबाबत काटेकोर नियम करावे, असे ते म्हणाले. नारळाचे पाणी व तेल या कारणाने मांढरादेवीची घटना घडल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. याबाबत खबरदारी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. 
@@AUTHORINFO_V1@@