जनता व माध्यमे तसेच प्रशासनातील सुसंवाद वाढीसाठी माहिती भवन उपयुक्त ठरणार : पालकमंत्री दादाजी भुसे.

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |
 

 
 
 
धुळे : जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून धुळ्यात साकार होणाऱ्या राज्यातील पहिल्या माहिती व जनसंपर्क भवनात जनता व प्रसारमाध्यमे, पत्रकार व शासन यांच्यातील सुसंवाद वाढीसाठी आवश्यक असलेल्या सेवा - सुविधा देण्यासाठी माहिती व जनसंपर्क भवन उपयुक्त ठरणार असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादाजी भुसे यांनी केले.
 
 
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात साकारणार असलेल्या माहिती व जनसंपर्क भवनाच्या भुमीपूजन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते, महापौर कल्पना महाले, आमदार अनिल गोटे, डी.एस.अहिरे, कुणाल पाटील, जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ.दिलीप पांढरपट्टे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गंगाथरण डी., महानगरपालिकेचे आयुक्त सुधाकर देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी एम.आर.वाडेकर यांच्यासह नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
 
 
पालकमंत्री श्री. भुसे म्हणाले, राज्यात प्रथमच माहिती व जनसंपर्क भवनाची निर्मिती होत आहे. त्यासाठी २ कोटी ११ लाख रुपयांचा प्राथमिक स्वरुपाचा निधी मंजूर झाला आहे. माहिती व जनसंपर्क भवनाच्या माध्यमातून पत्रकार बांधवांना विविध सेवा मिळतील. नियोजित माहिती व जनसंपर्क भवनात जिल्हा माहिती कार्यालय, पत्रकार परिषदा व माध्यम विषयक शासकीय कामांसाठी मिनी थिएटर, माध्यम सनियंत्रण कक्ष, लोकराज्य संदर्भ संग्रहालय, शासनमान्य यादीवरील वृत्तपत्रांसाठी रेकॉर्ड कक्ष, प्रसारमाध्यम अभिलेख कक्ष, प्रदर्शन हॉल, दृकश्राव्य माध्यम कक्ष, माहिती तंत्रज्ञान कक्ष आदी बाबींचा समावेश असेल.
 
 
सर्व सोयी सुविधांनी सज्ज असलेले राज्यातील पहिलेच माहिती भवनाचे भुमीपूजन माझ्या हातून होत असल्याचा विशेष आनंद व्यक्त करत या वास्तूच्या कामाचा दर्जा अबाधित ठेवून विहीत केलेल्या मुदतीत ही वास्तू उभी राहण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रयत्नशील राहून कामकाज करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
 
 
यावेळी जिल्हा माहिती अधिकारी रणजितसिंह राजपूत यांनी माहिती व जनसंपर्क भवनाची पार्श्वभूमी विषद करताना या भवनाच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधांची माहिती दिली.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@