अनुदानित बियाणेखरेदीसाठी शेतकरी रस्त्यावर

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    11-Jan-2018
Total Views |
 
 
 
 

बियाणे उपलब्ध न झाल्यास तीव्र आंदोलन : हेमंत पाटील

 
शिरपूर : शिरपूर येथील काही महत्वाच्या कृषीकेंद्राना महाबीजने अनुदानित बियाणे दिले आहे. तालुक्यातील शेतकरी बियाणे खरेदीसाठी पहाटे पाच वाजेपापासून रांगेत उभे राहत आहेत. तरी या कृषीकेंद्राकडून कोणत्याही प्रकारची सूचना किंवा सहकार्यही न करता कर्मचारी कार्यालय बंद करून जात असल्याने भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील यांच्या नेतृत्वात शहरातील मुख्य बाजारपेठेत संतप्त शेतकऱ्यांनी रस्ता रोको केला.
 
 
एका शेतीच्या उताऱ्यावर ४५ रु. किलोप्रमाणे प्रत्येक शेतकऱ्याला २० किलो भुईमुगाचे बियाणे देण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्याप्रमाणे महाबीजने शिरपूरमधील काही कृषी केंद्रांना तालुक्याला पुरेल एवढा साठा केला आहे. परंतु टंचाईचे कारण पुढे करीत चढ्या दराने काळ्या बाजारात हे अनुदानित बियाणे विकले जात आहेत असा आरोप यावेळी शेतकऱ्यांनी केला आहे. वारंवारअनुदानित बियाण्याची मागणी करूनहीसंबंधित कृषीसेवा केंद्र शेतकऱ्यांकडे पूर्णतः दुर्लक्ष करत आहेत. ही व्यथा शेतकऱ्यांनी भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील यांना सांगितली. पाटील यांनी तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत तालुका कृषी अधिकारी कार्यालयात मोर्चा नेत प्रशासनाच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. यापुढे नियमानुसार बियाणे दिले नाही तर संतप्त शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल असा इशाराही भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक हेमंत पाटील यांनी कृषी कार्यालयातील प्रशासनाला दिला आहे. यावेळी शिष्टमंडळाचे नेतृत्व भाजपा शहराध्यक्ष हेमंत पाटील, युवराज राजपूत राष्ट्रवादी कॉंग्रेस शहराध्यक्ष तर परेश शिंपी मनसेकडून उपस्थित होते.यावर कृषी कार्यालयास संपर्क साधला असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार देत, बियाणेचा पुरवठा कमी होत असल्याचे सांगितले.
 
 
साठेबाजी करून भाववाढ केल्यास...
 
तालुक्यात काही धनदांडगे कृषी सेवाकेंद्र चालक आहेत. गेली अनेक वर्ष शेतकऱ्यांना लुटूनच हे श्रीमंत झाले आहेत. कृषीसेवा केंद्र चालक आणि कृषी खात्यातील काही कर्मचार्यांची मोनोपोली आता शेतकरी सहन करणार नाहीत. ऐन पेरणीच्या वेळीच साठेबाजीकरून बियाण्यांचे भाववाढ करणाऱ्या भ्रष्ट लोकांना शेतकरीच धडा शिकवतील.
- हेमंत पाटील, शहराध्यक्ष, भाजपा, नगरसेवक शि.व.न.पा.शिरपूर
 
 
गैरप्रकार झाल्यास कडक कारवाई
 
अनुदानित बियाणे खरेदीसाठी जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत शिरपूर तालुक्यात प्रंचड मागणी होत आहे. पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त होत असल्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण होत आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यातील शिल्लक साठा शिरपूर तालुक्यात पाठवण्याचे वरिष्ठांना कळवले असून बियाणे विक्रीमध्ये गैरप्रकार निदर्शनास आल्यावर कडक कारवाई करण्यात येईल.
- पी.एम सोनवणे, उपविभागीय कृषी अधिकारी, धुळे
@@AUTHORINFO_V1@@