अखेर तुमसर व उमरवाडा मार्गावर स्वच्छता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
 
नवरगाव येथे ग्राम पंचायत पदाधिकारी व नागरिकांचा स्वच्छतेसाठी पुढाकार
 
 
भंडारा : तुमसर पासून हाकेच्या अंतरावरील नवरगाव येथे तुमसर व उमरवाडा मार्गावरील वर्षानुवर्षापासून असलेल्या उघडया हागणदारीच्या जागेची स्वच्छता करून रस्त्याच्या दोन्ही बाजूची जागा गोदरीमुक्त करण्यात आली आहे.
 
संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथीच्या दिवसी ग्राम पंचायत पदाधिकारी व सचिवांनी उघडया हागणदारीच्या जागेची स्वच्छता करण्याचा केलेला संकल्प तब्बल पंधरवडयात पूर्ण करून स्वच्छतेचे महानायक संत गाडगेबाबा यांना आदरांजली वाहण्यात आली आहे.
 
गोदरीमुक्त जागेची शाश्वत स्वच्छता ठेवण्यासाठी चिमुकल्यांनी पुढाकार घेतला असून सकाळी कोणीही जागेवर शौचास बसू नये याकरिता गावातील काही नागरिक व चिमूकले दोन्ही मार्गाने शिटी वाजवित, मॉर्निंग वॉक व व्यायाम करून निगराणी करीत आहे.
 
स्वच्छतेच्या या आगळयावेगळया उपक्रमाने नवरगाव मार्गाने ये जा करणारे नागरिक क्षणभर या ठिकाणी थांबून या उपक्रमाची पाहणी करीत आहेत. तालुक्यासाठी नवरगाव येथे राबविण्यात आलेला उघडया हागणदारीचा नाविण्यपूर्ण उपक्रम प्रेरणादायी ठरतो आहे.
@@AUTHORINFO_V1@@