केंद्रीय ग्रामीण विकास खात्याच्या चमुने केली मनरेगा कामाची पाहणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jan-2018
Total Views |
 
 
 
 
 
भंडारा: केंद्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या अधिकाऱ्यांनी आज जिल्हयातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंच्या कामाची पाहणी केली. कार्यक्रम अधिकारी श्रृती सिंग व अनिलकुमार कट्टा या दोन अधिकाऱ्यांचा या चमुमध्ये समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी आज मोहाडी तालुक्यातील धोप येथील मनरेगा कामाची पाहणी केली.
 
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सुशासन व सामाजिक अंकेक्षण करण्याच्या अनुषंगाने आज ही चमु जिल्हयाच्या दौऱ्यावर आली होती. या दौऱ्यात जनमाहिती फलक, केस रेकॉर्ड, वर्क फाईल, ग्रामपंचायत स्तरावर ७ रजिस्टर ठेवणे, जॉब कार्ड डिजाईन व तपासणी या विषयाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. ग्रामपंचायत धोप तालुका मोहाडी येथील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत पांदण रस्ता, सिमेंट रस्ता वृक्ष लागवड, सिंचन विहिर, पंतप्रधान आवास योजनेच्या कामाची पाहणी केली. या दरम्यान चमुने मजूरांशी वार्तालाप केला. 
@@AUTHORINFO_V1@@