प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये जालना जिल्हा देशात प्रथम

    27-Apr-2017
Total Views |


 

सन 2016-17 या वर्षात प्रधानमंत्री पीकविमा योजनेमध्ये उत्कृष्ट काम करुन जालना जिल्ह्याने संपूर्ण देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे. नवी दिल्ली येथील विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या नागरी सेवादिनाच्या कार्यक्रमात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी हे पारितोषिक स्वीकारले.

"राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकर, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास, मत्सव्यवसाय व वस्त्राद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर तसेच खासदार रावसाहेब दानवे यांनी प्रधानमंत्री पीकविमा योजनेची अंमलबजावणी जिल्ह्यात उत्तमरित्या व्हावी व शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. तसेच जिल्हा प्रशासनाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली उत्कृष्ट काम केल्यामुळे संपूर्ण देशातुन जिल्हाला हा प्रथम पुरस्कार मिळाला आहे. " अश्या भावना काही नागरिकांनी प्रतिनिधीशी बोलताना दिल्या.

जिल्हयात 2015-16 या वर्षी खरीपात एकूण रु. 25 कोटी विमा हप्ता भरुन पिक विमा घेतलेल्या जिल्हयातील जवळपास 95 टक्के शेतक-यांना रु. 431 कोटी 64 लाख रुपये आणि रब्बी मध्ये एकुण 2 कोटी विमा हप्ता भरून पिक विमा घेतलेल्या शेतक-यांना 44 कोटी 29 लाख रुपये कोटी इतकी नुकसान भरपाई मिळाली. सन 2016-17 मध्ये जिल्हा प्रशासनाच्या प्रयत्नातुन खरीपात 4 लाख 69 हजार आणि रब्बी मध्ये 1 लाख 27 हजार शेतक-यांनी 39 कोटी रुपयांचा विमाहप्ता भरुन पिकविमा योजनेत भाग घेतल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी दशरथ तांभाळे यांनी सांगितले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.