शॉर्ट अॅण्ड क्रिस्प : होम कमिंग

    19-Apr-2017   
Total Views |
 

आपल्या पैकी असे किती लोक आहेत जे नोकरी आणि किंवा शिक्षणाच्या कारणाने आपल्या घरापासून दूर आहेत? अनेक असतील नाही...? जेव्हा आपण नोकरीमुळे आपल्या घरापासून दूर जातो.. आणि नव्या शहरातच स्थायिक होतो, आपल्याला सगळ्यात जास्त गरज भासते ती आपल्या आई वडीलांची. लग्न झालेले असले,, स्वत:चा परिवार सुरु झाला असला, तरी देखील आई वडीलांची जागा कुणीच घेवू शकत नाही. आजच्या या धावपळीच्या आयुष्यात आई वडीलांनी मेट्रो सिटीज मध्ये यावं, आपल्या मुलांकडे रहावं अशी अपेक्षा सर्वच मुलांची असते. पण इतके वर्ष जिथे संसार केला आहे अशा घराला, अशा शहराला सोडून नवं आयुष्य सुरु करणं ते ही उतार वयात.. त्यांना किती कठीण जात असणार ना...?

पण यावर उपाय काय...? तर आपण आपल्या आई वडीलांना तोच माहोल, तेच वातावरण, आणि तेच आयुष्य देवू शकतो... आपल्या घरातील छोट्या छोट्या बदलांनी. त्यांचा विचार करुन आपलं घर सजवलं तर ते ही सुखात आपल्या सोबत राहतील, नाही का? असाच संदेश देण्यात आला आहे या "होम कमिंग" नावाच्या लघुपटात. खरं तर ही अर्बन लॅडर या इंटीरिअर वेबसाईटची जाहीरात म्हणता येईल. पण यामधील संदेश मनाला भिडणारा आहे.. यामध्ये अभिनय केला आहे प्रसिद्ध अभिनेत्री तापसी पन्नू, पियूष मिश्रा आणि अमित साध यांनी, तर या लघुपटाचं दिग्दर्शन विनय जायसवाल यांनी केलं आहे.  

एक जोडपं आई वडीलांपासून दूर राहत असतं, त्यांचे आई वडील येतातही मात्र ते वातावरण नसल्याने त्यांना अवघडल्यासारखं होतं. आपल्याच मुलाच्या घरात ते अनोळखीपणे राहतात.. यावर उपाय म्हणून त्यांचा मुलगा व सून काय करतात...?
 
चला तर आपण बघूयात... 

 

- निहारिका पोळ

निहारिका पोळ

रानडे इन्टिट्यूट पुणे विद्यापीठातून पत्रकारितेत पद् व्युत्तर शिक्षण. सध्या वेब मुंबई तरूण भारत येथे उपसंपादक. मूळ गाव जबलपूर. कथक नृत्यात अलंकार. कला, संस्कृती, युवांशी संबंधित विषयांवर लिहिण्याची आवड. 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121