जनता सहकारी बँकेच्या 'जेट पे' अॅपचे उद्घाटन!

    30-Dec-2017
Total Views |

 
 
 
बदलत्या कालानुरूप अत्याधुनिक बँकिंग सेवा देणाऱ्या पुण्यातील जनता सहकारी बँकेने 'युपीआय' या अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित असेलेले 'जेट पे' (जनता ईझी ट्रान्सफर) हे नवीन अॅप विकसित केले आहे. या अॅपचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्या हस्ते आज झाले. यावेळी बँकेचे अध्यक्ष श्री. संजय लेले, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. जयंत काकतकर, डॉ. कॅप्टन चितळे व बँकेचे संचालकीय मंडळ सदस्य उपस्थित होते.

जनता बँकेने 'जेट पे अॅप'च्या माध्यमातून डीजिटल इंडिया या चळवळीत सहभाग घेतला आहे. सर्वसामान्य ग्राहकांना 'जेट पे अॅप' द्वारे सहजरित्या पैशांची देवाणघेवाण करणे शक्य होणार आहे. ही सेवा अधिकाधिक वापरून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घ्यावा असे आवाहन डॉ. उमराणी यांनी यावेळी केली.
 
 
गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेले 'जेट पे अॅप'  
 
 
'जेट पे अॅप'च्या माध्यमातून बँकेचा खाते क्रमांक, आयएफएससी कोड, मोबाईल क्रमांक किंवा आधार क्रमांकाचा वापर करून ग्राहक अतिशय वेगवान व सुरक्षितरित्या पैशांचे व्यवहार करू शकतात. 'जेट पे अॅप' आता गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून ते 'डाऊनलोड' करून ३६५ दिवस ग्राहकांना आर्थिक व्यवहार करता येणार आहेत. कुठल्याही स्मार्ट फोनवर व सध्या 'अँड्रॉइड ४. १' आणि त्यावरील व्हर्जनवर हे 'अॅप' चालते. याद्वारे आपल्याला 'बँक टू बँक' व्यवहार करणे देखील शक्य आहे.
 
 
'जेट पे अॅप' उद्घाटनाचा संपूर्ण कार्यक्रम बँकेच्या फेसबुक पेजवरून लाईव्ह करण्यात आला होता.

यावेळी जनता बँकेच्या रूपे डेबीट कार्डचे 'प्लॅटिनम कार्ड' वितरित करण्यास प्रारंभ केला आहे. या नवीन कार्डच्या माध्यमातून दिवसाला ४० हजार रुपये खातेदारांना काढता येणार आहेत. देशातील ११ शहरांमधील विमानतळावर वेगवेगळ्या खरेदीसाठी या कार्डाचा उपयोग करता येईल.