इन्फोसिसच्या महत्त्वाच्या पदावर सलील पारेख यांची नियुक्ती

    02-Dec-2017
Total Views |


 

बेंगळुरू : इन्फोसिस या व्यवसाय समुहाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक पदी आज सलील पारेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. इन्फोसिसच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी पारेख यांच्या नियुक्तीबाबत म्हटले आहे की, यापूर्वी कॅपजेमिनी या आंतरराष्ट्रीय कंपनीसाठी सामान्य व्यवस्थापन समितीचे सदस्य म्हणून त्यांनी केलेले काम व त्या कंपनीत दिलेले योगदान मोलाचे होते. त्यांनी सांभाळलेल्या जबाबदाऱ्या आधीच्या कंपनीला नव्या उंचीवर नेऊन ठेवणाऱ्या होत्या. त्यामुळे इन्फोसिसने त्यांच्यावर दाखवलेला विश्वास ते सार्थ ठरवतील.
 
 
 
 

इन्फोसिसच्या नामनिर्देशन आणि वेतन समितीच्या अध्यक्षा किरण मुजुमदार शॉ यांनी पारेख यांच्यावर विश्वास दर्शवताना म्हटले आहे की, कंपनीच्या संचालक समितीने घेतलेला निर्णय योग्य ठरेल असा मला विश्वास वाटतो. जागतिक बाजारपेठेत माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अव्वल योगदान देणाऱ्या सलील पारेख यांच्या पूर्वीच्या कामाची व्याप्ती आणि अनुभव लक्षात घेऊन ही नियुक्ती करण्यात येत आहे.

 
 
 

सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक यु.बी.प्रवीण राव यांनी आज पदभार सोडल्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पूर्णवेळ संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे.

कोण आहेत सलील पारेख -

संगणक विज्ञान मध्ये अभियांत्रिकी पदव्युत्तर पदवी, कॉर्नेल विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग

आयआयटी बॉम्बे येथून वैमानिक अभियांत्रिकीमध्ये तंत्रज्ञान पदवी प्राप्त

 
 
 

महाराष्ट्रातील उद्योगांसाठी गरजेनुसार कौशल्य आधारित तंत्रज्ञान पुरवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सलील पारेख व इतर मान्यवरांच्या कार्याचा विशेष उल्लेख १२ एप्रिल २०१६ रोजी केला होता.