सर्व एक्झिट पोलचा अंदाज
आज गुजरातमध्ये शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडले. संध्याकाळी ५ वाजेला मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांनी आपले एक्झिट पोल जाहीर केले. यात हिमाचल आणि गुजरात दोन्ही राज्यातील एकूण मतदारांचा सर्व्हे करून घेण्यात आलेल्या अंदाजात दोन्ही राज्यात कमळ फुलेल अशी आकडेवारी समोर आलेली आहे.
गुजरात :
| संस्था | भाजप | काँग्रेस | अन्य |
| टुडेज चाणक्य | १३५ | ४७ | 3 |
| टाईम्स नाऊ - व्ही.एम.आर. | ११३ | ६६ | ३ |
| टी. व्ही.९ - सी वोटर | १०८ | ७४ | ० |
| न्यूज-एक्स सी एन क्स | ११०-१२० | ६५-७५ | २-४ |
| न्यूज नेशन | १२४-१२८ | ५२-५६ | १-३ |
| इंडिया टुडे - अॅक्सिस | ९९-११३ | ६८-८२ | १-४ |
| एबीपी - सीएसडीएस | ११७ | ६४ | १ |
हिमाचल प्रदेश :
| संस्था | भाजप | काँग्रेस |
| टाईम्स नाऊ - व्ही.एम.आर. | ५१ | १७ |
| इंडिया टुडे - अॅक्सिस | ५१ | १७ |
| एबीपी - सीएसडीएस | ३८ | २९ |
| झी न्यूज | ५१ | १७ |
| न्यूज २४ | ५५ | १३ |
| सहारा समय | ४६ | २१ |
गुजरातमध्ये एकूण १८३ विधानसभेच्या जागांसाठी झालेल्या मतदानात सर्वाधिक जागा भाजप जिंकेल असाच अंदाज सर्व सर्वेक्षण संस्थांनी नोंदविला आहे. त्यामुळे गेल्या २२ वर्षापासून सत्तेत असलेला भाजप यापुढे देखील सत्तेत असण्याचे भाकीत वर्तविले जात आहे. हिमाचल प्रदेशमध्ये एकूण ६८ विधानसभा जागांसाठी ९ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले होते. तेथील सर्व्हेक्षणानुसार आलेल्या आकडेवारीनुसार तेथे सत्तापरिवर्तन होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. तेथे काँग्रेसची सरकार जाऊन भाजपचे सरकार बनेल, या दिशेने एक्झिट पोलची आकडेवारी आलेली आहे.
अंतिम निकाल १८ डिसेंबर रोजी माहिती होणार आहे. निवडणूक आयोगातर्फे १८ डिसेंबर रोजी दोन्ही राज्याची मतमोजणी आहे. त्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.