१३ डिसेंबर २०१५ रोजी भारतीय क्रिकेट संघातील आघाडीचा फलंदाज रोहित शर्मा याने रितिका सजदेह हिच्याशी लग्न केलं. आज त्यांच्या लग्नाचा दुसरा वाढदिवस आहे. आपल्या बायकोला लग्नाच्या वाढदिवसादिवशी काहीतरी 'स्पेशल' भेट देण्याची प्रत्येकचं नवऱ्याची इच्छा असते. काहींना ते जमतं तर काहींना जमत नाही. पण रोहित शर्माने आजच्या सामन्यात दणदणीत द्विशतक ठोकून ते जमवून दाखवलं.
भारतीय संघाचा कर्णधार म्हणून तो आज सलामीवीर या नात्याने शिखर धवन सोबत मैदानात उतरला. हा सामना बघायला मैदानावर रोहितची बायको रितिका उपस्थित असणार हे नक्कीच होतं. सुरुवातीला रोहितचा खेळ अडखळतच झाला पण नंतर त्याने आपल्या खेळात सुधारणा करत धडाकेबाज फलंदाजी केली. शतक पूर्ण झाल्यावर रोहितने रितिकाला स्पेशल किस दिला. दीडशतकानंतर रोहित जेव्हा द्विशतकाकडे वाटचाल करत होता तेव्हा रितिका भावूक होऊन सामना बघत होती. आणि ज्यावेळी खरंच रोहितने द्विशतक पूर्ण केले तेव्हा मात्र तिच्या डोळ्यात अश्रू आले होते. अर्थातच हे आनंदाश्रू होते! रोहितने द्विशतक ठोकून रितिकाला लग्नाच्या दुसऱ्या जन्मदिनी दिलेली हि भेट त्या दोघांच्याही नक्कीच कायमची लक्षात राहील.
रोहितने द्विशतकापर्यंतचा बहारदार खेळ व त्यांनतर रितिकाच्या भावूक मुद्रा तुम्ही
खालील व्हिडिओ मधून पाहू शकाल...