विराट-अनुष्का अखेर विवाह बंधनात!

    11-Dec-2017
Total Views |


 
गेल्या आठवड्याभरापासून भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहली प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का शर्मा हिच्याशी लग्न करणार अशी चर्चा प्रचंड जोर धरत होती. कोणी म्हणायचं ही बातमी खरी आहे, तर कोणी ही अफवा असल्याचे सांगायचे. पण आज अखेर विराट-अनुष्का विवाहबंधनात अडकल्याचे वृत्त मेडियामधून अधिकृतरीत्या झळकत आहे. इटली येथे मोजक्या मित्रमंडळींच्या सोबतीने या दोघांनाच विवाहसोहळा संपन्न झाल्याचे म्हणाले जात आहे. अनुष्का आणि विराट या दोघांनीही ट्विटरवरून हि गोड बातमी सगळ्यांसोबत शेअर केली आहे.
 
 
 
ते म्हणतायत, आज आम्ही एकमेकांना प्रॉमिस केलं आहे,की आम्ही आयुष्यभर प्रेमाने सोबत राहू. ही बातमी तुमच्याशी शेअर करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. आमच्यावर सातत्याने प्रेम केल्याबद्दल धन्यवाद!''
 
 
 
इटलीतील टस्किन मधल्या बॉर्गो फिनोखीऐनेतो या रिसॉर्टवर हा शाही विवाहसोहळा संपन्न झाला आहे. या बातमीमुळे इंटरनेटवर अक्षरशः खळबळ माजली आहे, आणि असं का नाही होणार..? कारण दोघांचाही फॅन फॉलोविंग जबरदस्त असून त्यापैकी प्रत्येकालाच त्यांच्या लग्नाची उत्सुकता होती. अनुष्काचं विकिपीडियावरील प्रोफाईल देखील अपडेट झालं असून त्यामध्ये नवऱ्याच्या समोर विराट कोहलीचं नाव लिहिण्यात आलं आहे.
 
 
 
लवकरच मुंबईमध्ये लग्नाची रिसेप्शन पार्टी होईल व त्यामध्ये सर्वच क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित राहतील अशी चर्चा आहे. लवकरच या सगळ्याबाबत अधिकृत माहिती मिळेल, अशी आशा आहे.