सोमनाथ (गुजरात) : कोणत्याही निवडणूका जवळ आल्या की सामान्यपणे काँग्रेसची नेते मंडळी मशिदी आणि मदरसा यांना भेटी देण्याचा सपाटा लावतात असे दिसते. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत हे चित्र बदलले आहे. २०१४ पासून काँग्रेसला सातत्याने हिंदू मतांचा घटता पाठिंबा असल्याचे दिसत असल्यामुळे काँग्रेसने आपली रणनिती बदलून हिंदू मतदारांना खुश करण्यासाठी मंदिरभेटी सुरु केल्या आहेत. गुजरातमध्ये सध्या काँग्रेसचे विद्यमान उपाध्यक्ष व संभाव्य अध्यक्ष राहूल गांधी यांनीही हेच धोरण अवलंबले आहे. त्याचाच एक भाग म्हणून ते आज गुजरातमधील जगप्रसिद्ध सोमनाथ मंदिरात दर्शनासाठी गेले होते. आपल्या या कृतीने आपण गुजरातमधील हिंदूंचा विश्वास संपादन करू या विचाराने केलेल्या या कृतीचा परिणाम मात्र भलताच होताना दिसत आहे कारण आता प्रत्येकजण राहूल गांधी यांना त्यांचा धर्म विचारत आहे.
Finally Rahul Gandhi comes clean on his religion, signs visitor register in Somnath (as per rule) meant for non-Hindus. If he isn’t a Hindu by faith, let alone a practicing one, then why has he been fooling people with these temple visits? pic.twitter.com/Igh5wxitkt
— Amit Malviya (@amitmalviya) November 29, 2017
सोमनाथ मंदिरात सर्व धर्माच्या लोकांना मुक्त प्रवेश आहे. मात्र अहिंदू नागरिकांना मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी आपली नोंद करणे अनिवार्य असते. याच नोंदणी पुस्तकात आज राहूल गांधी यांची नोंद अढळली व त्यावरून आता बराच वादंग उसळला आहे. भाजपचे सोशल मिडिया प्रमुख अमित मालवीय यांनी या नोंदणीपुस्तकातील नोंदणीचे छायाचित्र प्रकाशित केले आहे. तसेच राहूल गांधी हे जर अहिंदू असतील तर ते मंदिरात दर्शनाचा फार्स का करत आहेत, केवळ मतांसाठीच का? असा प्रश्नही मालवीय यांनी उपस्थित केला आहे.
आप अगर सोमनाथ मंदिर जाएँ, और आप हिन्दू धर्म से नहीं हैं, तो आपको एक रेजिस्टर में इस बात का ख़ुलासा करना पड़ता है। आज राहुल गांधी ने उसी रजिस्टर में अपने नाम को जोड़ दिया। देश के साथ धर्म को ले कर ऐसा छलावा? pic.twitter.com/Ieen80ekpL
— Amit Malviya (@amitmalviya) November 29, 2017
हा फोटो सोशल मिडियावर खूप व्हायरल होत आहे. राहूल गांधी यांनी या नोंदणी पुस्तकात आपण हिंदू नसल्याची नोंद केली असेल तर मग त्यांचा नेमका धर्म कोणता असा प्रश्न आता नेटिझन्स उपस्थित करत आहेत. गुजरात निवडणूक एकगठ्ठा मुस्लिम मतांच्या आधारे जिंकता येणार नाही याची पुरेपूर खात्री झालेल्या काँग्रेसला राहूल यांच्या या घोळाने पुरतेच घेरले आहे. गुजरातमधील तसेच देशभरातील जनतेच्या वाढत्त्या दबावापुढे झुकून राहूल गांधी आपला धर्म जाहीर करतात अथवा तो गुलदस्त्यातच ठेवून पुढील प्रचार करतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
Ambassador Meera Shankar, UPA’s representative in US, had referred to Sonia Gandhi as a Christian leader. The reference was soon deleted. Now Rahul Gandhi declares he is a non-Hindu but their election affidavits claim that they are Hindus. Gandhis lying about their faith? pic.twitter.com/iFE4AhVnRM
— Amit Malviya (@amitmalviya) November 29, 2017
दरम्यान सोमनाथ मंदिर ट्रस्टने या नोंदीची पुष्टी केली आहे. राहूल गांधी व अहमद पटेल या दोघांचीही नावे या वहीत असल्याचे मंंदिर प्रशासनाने कळवले आहे. तसेच या नोंदी स्वतः त्या दोघांनी केल्या नसून काँग्रेसचे माध्यम संयोजक मनोज त्यागी यांनी या दोन्ही नोंदी केल्या असल्याचे समजते आहे. मात्र अद्याप काँग्रेसकडून या नोंदींबाबत कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
Congress Vice President @OfficeOfRG began his 2 day Gujarat tour by offering prayers at Somnath Mandir today.#Congress_Aave_Chhe pic.twitter.com/LhWfhGuxbk
— Indian Youth Congress (@IYC) November 29, 2017