जरा हलकेच घ्या बरं .....पॉकेमॉन “खेळता खेळता” युवराज पोहोचले बंगल्यावर......

    29-Jul-2016
Total Views |

आज सकाळी युवराजांच्या भेटीला पोचले, ‘राज’कीय युवराज....

मुम्बानगरीच्या महालात आणि संपूर्ण ‘राम’राज्यात एकच खळबळ उडाली... दोन्ही युवराजांचे मनोमिलन येत्या निवडणूकींच्या तोंडावर होणार का ...?

की, चव्हाट्यावर आलेली ‘घरची भांडण’ मिटणार...? प्रत्येक ‘दवंडी पिटवणाऱ्याचे’ वेगवेगळे प्रश्न....

पण, इथं प्रश्न मात्र वेगळाचं...

‘बाल’ हट्टावरून आणले गेले का पेंग्विन...? की, पोकेमॉन ठरला ‘बंगला’ भेटीचं कारण....

तर..... झालं असं.

अचानक ‘राज’कीय युवराज निघाले फेरफटका मारायला. तसही आता कोणी भाव देत नाहीये निदान या खेळाने तरी साथ द्यावी.. बरं वाटेतून आपल्या “सुदाम्या” बरोबर जाताना ‘पोकेमॉन’ लोकेट झाला. आणि हा लोकेट झालेला पोकेमॉन ‘पॉवर फूल’ असेल असे समजून युवराजांनी तो पकडण्याचा निश्चयच केला.

कधी नव्हे ते हवेत बसणारा ‘बाण’ आज खरचं योग्य ‘निशाण्या’वर बसला.... आणि युवराजांच्या दृष्टीने पॉवर फूल पोकेमॉन पदरात पडला.

आता महालात बालहट्टाशी या पोकेमॉनसाठी मारामारी करावी लागली की, प्रत्यक्ष युवराजांशी. हे आता जेव्हा खरेच ‘बाण’ बाहेर काढायची वेळ येईल तेव्हाच कळेल, की “आदूबाळ व युवराजांच्या” पोकेमॉन ‘पॉवर फूल’ निघाला की, ‘राज’कीय युवराजांचा.

एकूण काय, आजची बंगला भेट असली-तसली नव्हती तर “पॉवर फूल पोकेमॉन” पकडण्यासाठीची होती.

असे म्हणायला हरकत नाही.