नालंदा विद्यापीठ (भारत)-



बिहारमधील नालंदा विद्यापीठाला जागतिक वारसा म्हणून घोषित केल आहे. युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत या प्राचीन विद्यापीठाचा समावेश यावर्षी करण्यात आला आहे.
इसवीसन पूर्व ३रे शतक ते इसवीसन १३वे शतक या कालावधीत हे अभ्यासी भिख्खूचे केंद्र मानले जायचे. यात स्तूप, तीर्थस्थान व विहारांचा समावेश होता. यावरील कलाकारी ही दगड व धातूंच्या वापरातून बनवली आहे.
भारतीय उपखंडातील सर्वात पुरातन विद्यापीठांमध्ये नालंदाचा समावेश होतो. गेली सलग ८०० वर्षे अविरत ज्ञानदानाचे काम येथे अखंडपणे सुरू आहे.
बौध्द भिख्खूंची शैक्षणिक परंपरा व बौध्द संप्रदायाचे बौध्द धर्मात झालेल्या रूपांतराची साक्ष म्हणजे नालंदा विद्यापीठ होय.
झियोझियांग हुआशान रॉक आर्ट कल्चर लॅंडस्केप(Zuojiang Huashan Rock Art Cultural Landscape) (चीन)-
चीनच्या नैऋत्य सीमा क्षेत्रात हे ठिकाण आहे. लोउयु(Luoyue) या वंशाच्या लोकांचे जीवन व परंपरा या ३८ शिल्पात पाहायला मिळतात. इसवीसन पूर्व ५वे शतक ते इसवीसन २रे शतक या कालखंडता ही शिल्पकला कोरली गेली आहेत.
दक्षिण चीनभागातील ड्रमसंस्कृती, नद्या व पठारे यांची निसर्गचित्रे या शिल्पात रेखाटण्यात आली आहेत. या संस्कृतीचे केवळ अवशेष आता शिल्लक आहेत.
द पर्शियन कॅनट(The Persian Qanat ) (इराण)-


इराणसारख्या शुष्कप्रदेशात शेती व इतर कामांसाठी पाण्याची सोय ही प्राचीन काळापासून कॅनट प्रणालीव्दारे केली जात आहे. दरीतील पाणी भूमीगत बोगद्यांच्या रचेनेव्दारे सपाट भूप्रदेशापर्यंत पोहोचविण्याचे काम ही प्राचीन प्रणाली करते.
या प्रणालीतील ११ कॅनट हे झरे, जलाशय व कृषीकामगारांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. ही पारंपारिक पाणी व्यवस्था समान पाणी वाटपाचे तत्व तेवढ्याच परिणामकारकरित्या काम करते.
इराणसारख्या वाळवंटी प्रदेशातसुध्दा मानवी जीवन व संस्कृती अस्तित्वात होत्या याची साक्ष हे कॅनट प्रणाली देतात.
नॅन मॉडेल- सेरोमोनीयल सेंटर ऑफ इस्टर्न मायक्रोनेशिया (मायक्रोनेशिया)-


नॅन मॉडेल या माक्रोनेशियाच्या दक्षिण-पूर्व किनाऱ्यावर ९९ छोट्या बेटांवर खडक व प्रवाळांच्या वापराने कृत्रिम प्रकारे भिंतीं उभारण्यात आल्या आहेत. इसवीसन १२०० ते १५०० या कालखंडात या बेटांवर दगडी राजवाडे, मंदिरे बांधण्यात आली होती. जी या राज्याच्या उत्सवस्थळांची व प्रशांत महासागरातील मानवी संस्कृतीची साक्ष देतात. मेघालीथीक संरचनेच्या माध्यमातून या वास्तू तेथील धार्मिक व तांत्रिक सुसंस्कृतपणाचे पुरावे देतात