आमदार झाल्यास, पगार घेणार नाही : चांगदेव गिते

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jan-1900
Total Views |





आष्टी : जनतेने एकदा संधी दिल्यास आमदाराला मिळणाऱ्या सुमारे १ लाख ८३ हजार ४४० रूपये पगारांपैकी मी फक्त ३० हजार रुपये वेतन म्हणुन स्वीकारेन. उर्वरीत रक्कम ही पब्लिक खात्यात जमा केली जाईल किंवा लोकांची इच्छा असल्यास पगाराची पुर्ण रक्कम लोकांच्याच सल्ल्याने विकास कामासाठी वापरली जाईल किंवा एखादं पब्लिक खातं तयार करून जनतेच्या हातात दिली जाईल अशी मोठी घोषणा बीड जिल्ह्यातील आष्टी/पाटोदा/शिरूर तालुक्यातील इच्छुक उमेदवार चांगदेव गिते यांनी केली आहे.


गिते हे अत्यंत अभ्यासू , धाडसी अन कष्टाळू नेते म्हणुन राज्यात परिचित आहेत. सध्या आमदाराला भरघोस पगार, पेंशन व इतर अनेक सोयी-सुविधा मिळतात त्यामुळे आपल्याला इतक्या पगाराची आवश्यकता नसुन ३० हजारात आपला खर्च चालु शकतो. शिवाय राज्याच्या तिजोरीवर अगोदरच ताण असताना आपण ते पैसे शेतकऱ्यांसाठी खर्च करू इच्छितो असा मानस गिते यांनी व्यक्त केला आहे. शिवाय आता सर्वत्र मोबाईल आल्याने आमदार-खासदारांना मिळणारे टपाल खर्च व दूरध्वनी बिल ही कमी केले पाहिजे अशी ही इच्छा गिते यांनी व्यक्त केली. गिते यांच्या घोषणेचे सर्वत्र कौतुक अन चर्चा होत आहे.

@@AUTHORINFO_V1@@