भाजपकडून उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर!

    27-Apr-2024
Total Views |
 
Ujjwal Nikam
 
मुंबई : लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर महायूतीने आणखी एका उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. महायूतीने मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला. याठिकाणी जेष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे.
 
राज्यात सध्या लोकसभा निवडणूकांची रणधूमाळी सुरु आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत दोन टप्प्यात झालेल्या लोकसभा निवडणुकीत १३ मतदारसंघातील मतदान पार पडलं. या दोन टप्प्यानंतर आता तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यातील लोकसभा मतदारसंघातील प्रचाराला वेग आला आहे. दरम्यान, अशातच भाजपने जेष्ठ कायदेतज्ञ उज्ज्वल निकम यांना मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली.
 
हे वाचलंत का? -  काँग्रेसला मोठा धक्का! बड्या नेत्याला एमआयएमची ऑफर
 
दुसरीकडे, या लोकसभा निवडणूकीत महाविकास आघाडीने काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांना उमेदवारी दिली. त्यामुळे यावेळी मुंबई उत्तर मध्य लोकसभेत उज्ज्वल निकम विरुद्ध वर्षा गायकवाड असा सामना रंगणार आहे. उज्ज्वल निकम यांनी सरकारी वकील म्हणून अनेक बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.