प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान, म्हणाले, "विधानसभेत वंचित आणि काँग्रेस..."

    27-Apr-2024
Total Views |
 
Prakash Ambedkar
 
मुंबई : विधानसभा निवडणूकांमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढणार असल्याचे वक्तव्य वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला. दरम्यान, त्यांच्या या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
 
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, "एका बाजूला शिवसेना आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाचं सॅण्डविच केलेलं आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये विधानसभा निवडणूका आहेत. त्या विधानसभेत वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र लढू शकते. त्यामुळे नाराजी काढा आणि वंचितला मदत करा," असे आवाहन त्यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केले आहे.
 
हे वाचलंत का? -  अल्पसंख्यांकांच्या बाबतीत काँग्रेसचे धोरण ढोंगीपणाचे : भाजपा आ. प्रविण दरेकर
 
ते पुढे म्हणाले की, "काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची भेट झाल्यानंतर ते व्यथित असल्याचे स्पष्टपणे दिसते. तसेच ते त्यांच्या राज्याच्या नेतृत्वावर नाराज असल्याचेही खाजगीत सांगतात. त्यामुळे विधानसभेत आपल्याला एकत्र बसून लढता येईल. त्यासाठी आतापासूनच वंचितसोबत जुळवायला सुरुवात करा अशी ऑफर आम्ही त्यांना दिली आहे. लोकसभेनंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष वेगवेगळे लढतील," असेही ते म्हणाले.