मध्य रेल्वेच्या उपनगरीय सेवेवर उद्या मेगा ब्लॉक

पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नाही.

    27-Apr-2024
Total Views |

railway


मुंबई, दि. २७ :  
मध्य रेल्वे मार्गावर देखभालीची कामे करण्यासाठी उपनगरीय सेवेवर आज मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यानुसार, सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर तर सीएसएमटी-चुनाभट्टी-वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी ११:४० ते दुपारी ४:४० पर्यंत आणि चुनाभट्टी-वांद्रे-सीएसएमटी अप हार्बर मार्गावर सकाळी ११:१० ते दुपारी ४:१० पर्यंत ब्लॉक असणार आहे. मात्र पश्चिम रेल्वेवर रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नाही.

ठाणे-कल्याण अप आणि डाऊन

ठाणे-कल्याण अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.४३ ते दुपारी ३.४४ वाजेपर्यंत मुलुंड येथून सुटणाऱ्या डाऊन धीमी/सेमी जलद सेवा मुलुंड आणि कल्याण स्थानकांदरम्यान ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा, डोंबिवली स्थानकावर थांबतील आणि वेळापत्रकानुसार १० मिनिटे उशिराने पोहोचतील.

अप हार्बर आणि डाऊन हार्बर

ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्ला (प्लॅटफॉर्म क्र. ८) दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील. हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते संध्याकाळी ६.०० या कालावधीत मुख्य मार्गावर आणि पश्चिम रेल्वे मार्गे प्रवास करण्याची परवानगी आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोडवरून वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ पर्यंत सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि वांद्रे/गोरेगावसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ पर्यंत सुटणारी सेवा डाऊन हार्बर मार्गावरील सेवा कायम राहील. पनवेल/बेलापूर/वाशी येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत आणि गोरेगाव/वांद्रे येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत बंद राहतील.

डाऊन धिमी लाईन

१) ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटी येथून सकाळी ९:५३ वाजता टिटवाळ्यासाठी सुटेल.
२) ब्लॉकनंतर पहिली विशेष लोकल बदलापूरसाठी सीएसएमटी येथून दुपारी ३:०५ वाजता सुटेल.

अप धिमी लाईन

१) ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल कल्याण येथून सीएसएमटीसाठी सकाळी १०:२५ वाजता सुटेल.
२) ब्लॉकनंतर पहिली लोकल दुपारी ४:१७ वाजता कल्याण येथून परळसाठी सुटेल.

अप हार्बर

१) सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी ९:४० वाजता सुटेल.
२) सीएसएमटीसाठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल वांद्रे येथून सकाळी १०:२० वाजता सुटेल.
३) सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल पनवेल येथून दुपारी ३:२८ वाजता सुटेल.
४) सीएसएमटीसाठी ब्लॉकनंतर पहिली लोकल गोरेगाव येथून दुपारी ४:५८ वाजता सुटेल.

डाऊन हार्बर

१) ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल सीएसएमटी येथून सकाळी ११:०४ वाजता सुटेल.
२) गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल सीएसएमटी येथून सकाळी १०:२२ वाजता सुटेल.
३) ब्लॉकनंतर पनवेलसाठी पहिली लोकल सीएसएमटी येथून दुपारी ४:५१ वाजता सुटेल.
४) ब्लॉकनंतर पहिली लोकल सीएसएमटी येथून दुपारी ४:५६ वाजता सुटेल.