भारताला आणि जगाला झेप घेण्यासाठी...

इंडिगोचा विमान खरेदीसाठी अब्जावधींचा करार

    27-Apr-2024
Total Views |

indigo


मुंबई, दि.२७ : प्रतिनिधी 
"आम्ही देशाला आणि जगाला पंख देणारे....आज आम्ही इंडिगोच्या प्रवासात आणखी एक महत्त्वाचा आणि अतिशय रोमांचक टप्पा गाठला आहे. कारण आम्ही ३० 'A350-900' एअरबस वाइड-बॉडी विमानांची ऑर्डर दिली आहे." असे जाहीर करत इंडिगोने भारतीय विमान वाहतुकीमध्ये आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.
देशातील सर्वात मोठी एअरलाइन इंडिगोने विमान निर्माता कंपनी एअरबसकडून ३० वाइड-बॉडी 'A350-900 विमानांची ऑर्डर दिली आहे. गुरुवार दि.२५ रोजी इंडिगो, एअरबस आणि रोल रॉयसच्या प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुडगाव येथील इंटरग्लोबच्या कॉर्पोरेट मुख्यालयात हा महत्वपूर्ण करार करण्यात आला. २०३० पर्यंत देशाला जागतिक विमानचलन केंद्र म्हणून स्थान देण्याच्या भारत सरकारच्या दृष्टीकोनाला वाइड-बॉडी विमानातील इंडिगोची गुंतवणूक धोरणात्मक बळकटी देणारी आहे. कंपनीकडे अशी आणखी ७० विमाने खरेदी करण्याचा पर्याय आहे.


इंडिगोने वाइडबॉडी विमानाची दिली ऑर्डर


इंडिगोने एका निवेदनात म्हटले की, तीस 'A350-900 विमानांची ऑर्डर दिल्यानंतर ते वाइड बॉडी विमानांचे संचालन करणाऱ्या एअरलाइन कंपन्यांमध्येही सामील होतील. इंडिगोच्या ताफ्यात तीस विमाने (A350-900) आल्यानंतर, भारतातील मोठ्या शहरांना जगभरातील मोठ्या शहरांशी जोडण्यात विमान कंपनी यशस्वी होईल. या विमानांमध्ये रोल्स-रॉयस ट्रेंट एक्सडब्ल्यूबी इंजिन बसवलेले आहेत, जे विमानाला अतुलनीय मिशन क्षमता आणि कार्यक्षमता देतात. त्याचबरोबर इंडिगो वाईड बॉडी विमानांची ऑर्डर देऊन आपला ताफा मजबूत करेल.


डिलिव्हरी २०२७ मध्ये मिळणार

इंडिगोने सांगितले की, या तीस A350-900 ची डिलिव्हरी २०२७ पासून सुरू होईल. याव्यतिरिक्त, इंडिगोला या क्रमाने ७० एअरबस A350 फॅमिली विमाने खरेदी करण्याचा अधिकार आहे, जो त्यास आणखी लवचिकता प्रदान करते. मात्र, विमानांचे नेमके कॉन्फिगरेशन नंतर ठरवले जाईल. सुमारे १७ वर्षांपासून भारतात विमान वाहतूक व्यवसायात सक्रिय असलेल्या इंडिगोकडे सध्या ३५० नॅरोबॉडी विमानांचा ताफा आहे. तसेच, कंपनीने तुर्की एअरलाइन्सकडून दिल्ली आणि मुंबई ते इस्तंबूलसाठी दोन बोईंग ७७७ विमाने भाड्याने घेतली आहेत.