संजू राठोडचं 'गुलाबी साडी' गाणं झळकलं 'न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर

    27-Apr-2024
Total Views |

gulabi sadi  
 
 
मुंबई : फोन हातात घेतला आणि इन्स्टाग्राम सुरु केलं की ‘गुलाबी साडी’ (Gulabi Sadi) या गाण्यावरील रिल्स लक्ष वेधून घेतात. अगदी माधुरी दीक्षितलाही या गाण्यावर रिल करम्यास भाग लावणारं (Gulabi Sadi) हे गाणं थेट टाईम्स स्केवरवर झळकलं आहे. गायक संजू राठोड (Sanju Rathod) याचं 'गुलाबी साडी' (Gulabi Sadi) हे गाणं सोशल मिडीयावर सध्या तुफान व्हायरल झाले आहे. आणि आनंदाची बाब म्हणजे 'गुलाबी साडी' हे मराठी गाणं 'न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअर'वर झळकलं असून 'टाईम्स स्क्वेअर'वर झळकणाऱ्या पहिल्या मराठी गाण्याचा मान या गाण्याला मिळाला आहे.
 
टाईम्स स्क्वेअरवर गुलाबी साडी हे गाणं झळकल्यानंतर संजू राठोडने प्रतिक्राय देत म्हटलं की, “गायक म्हणून सिनेइंडस्ट्रीत पदार्पण करताना हे इतके यश मिळेल याचा कधी विचारही केला नव्हता. अल्पावधीतच एवढे यश मिळाले यासाठी मी स्वत:ला फार भाग्यवान समजतो. आतापर्यंत माझ्या गाण्यांनी मिलियन व्ह्यूजचा टप्पा पार केला हाच आनंद माझ्यासाठी फार मोठा होता. त्यात आता न्यूयॉर्क टाईम्स स्क्वेअरवर माझे गाणे झळकले. यामुळे माझ्या आनंदात आणखी भर पडली आहे”.
 
आनंदाची बाब म्हणजे 'गुलाबी साडी' या गाण्याला 'यूट्यूब'वर ७० मिलियन व्ह्यूज मिळाले असून 'स्पॉटीफाय'वरही या गाण्याने १५ मिलियनचा टप्पा पार केला आहे. याशिवाय 'यूट्यूब'वरील जागतिक स्तरावर उच्चांक गाठणाऱ्या व्हिडीओंमध्ये आणि 'स्पॉटीफाय'च्या जागतिक व्हायरल गाण्यांमध्ये 'गुलाबी साडी' गाणं आपला डंका वाजवत आहे.