'नायक' पाहून मुख्यमंत्री होण्याची प्रेरणा मिळाली? मुख्यमंत्री म्हणाले...

    27-Apr-2024
Total Views |
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अभिनेता मनिष पॉलच्या पॉडकास्टमध्ये नुकतीच हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर दिलखुलास गप्पा मारल्या
 

eknath shinde 
 
मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सध्या निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. महाराष्ट्रभर ते प्रचार करताना दिसत असून सध्या ते आणखी एका कारणासाठी चर्चेत आहेत. ते म्हणजे नुकतीच त्यांनी मनिष पॉल यांच्या पॉडकास्टमध्ये (CM Eknath Shinde) हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी अभिनेते अनिल कपूर यांचा नायक चित्रपट का आवडतो याचा खुलासा केला आहे.
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले " मला एस शंकर यांचं दिग्दर्शन असलेला नायक सिनेमा खूप आवडतो. त्यातील अनिल कपूरची भूमिका मला मनापासून आवडली. नायक मधील अनिल कपूर यांचं काम उत्तम होत आणि हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे."
 
यावेळी मनिषने त्यांना हा चित्रपट पाहूनच मुख्यमंत्री होण्यासाठी प्रेरणा घेतली का? असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री म्हणाले, "शेवटी चित्रपट हा चित्रपट आहे. आणि वास्तविक आयुष्य वेगळं आहे. अजून काही नाही." असं उत्तर त्यांनी दिलं.
याशिवाय काही दिवसांपूर्वी अभिनेता मनिष पॉल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा सारथी झाला होता. एअरपोर्टवरुन मुख्यमंत्री बाहेर आले असता मनीष पॉल मुख्यमंत्र्यांची गाडी चालवताना दिसला होता.