नागपूर मेट्रो फेज २च्या कामांना गती

ट्रॅक इंस्टॉलेशनच्या कामासाठी २ कंपन्या मैदानात

    27-Apr-2024
Total Views |

nagpur metro


नागपूर, दि.२७ :
महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमआरसीएल) ने नागपूरच्या मेट्रो नेटवर्कमधील महत्त्वाच्या टप्प्याचे अनावरण केले आहे आणि फेज-2 मध्ये एलिव्हेटेड मेट्रो व्हायाडक्ट बांधण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे , ज्यामुळे शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासात लक्षणीय प्रगती झाली आहे.


नागपूर मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात बुटीबोरीपर्यंत मेट्रो रेल्वेचा विस्तार करण्यात येणार असून हे अंतर 19 किमी आहे. लोकमान्य नगर स्थानक ते हिंगणापर्यंत सात किमीचे मेट्रोचे जाळे विस्तारले जाईल, तर ऑटोमोटिव्ह चौक ते कन्हानपर्यंत १३ किमी आणि प्रजापती नगर ते कापसीपर्यंत ५.५ किमी मेट्रोचे जाळे टाकण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात एकूण ४४ किमी मेट्रो रेल्वेचे जाळे टाकण्यात येणार आहे.

या प्रकल्पासाठी राही इन्फ्राटेक लिमिटेड आणि एनएमसी इंडस्ट्रीज प्रा. लिमिटेड ने गेल्या आठवड्यात बॅलेस्टेड ट्रॅक पुरवठा आणि स्थापना (इन्स्टॉलेशन) करण्यासाठी निविदा सादर केल्या. त्यानंतर महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (महा-मेट्रो) ने तांत्रिक निविदा उघडल्या. पॅकेज T-०१ च्या व्याप्तीमध्ये खापरी ते बुटीबोरीला जोडणाऱ्या नागपूर मेट्रो ऑरेंज लाईनच्या १८.७ किमी रीच १या च्या लहान १.७४६ किमी एट-ग्रेड विभागात ट्रॅक-वर्क समाविष्ट आहे. हा भाग इको पार्क स्टेशन आणि मेट्रो सिटी स्टेशन नावाच्या दोन मेट्रो स्टेशनसह जोडतो. महा-मेट्रोने मार्च २०२४मध्ये अंदाजे १५० दिवस कालावधीमध्ये काम पूर्ण करण्याच्या मुदतीसाठी अंदाजे रु. ७.९६ कोटी इतक्या किमतीच्या निविदा उघडल्या.