CID मधील अभिजीत आणि दया करणार कमबॅक

    26-Apr-2024
Total Views |
अभिनेते शिवाजी साटम यांची प्रमुख भूमिका असलेली ‘सीआयडी’ ही मालिका ९०च्या दशकात प्रचंड गाजली होती. १९९८ साली सुरु झालेली ही मालिका २० वर्ष सुरु होती.
 

cid  
 
मुंबई : “दया ये दरवाजा तोड दो”, “कुछ तो गडबड है...” ही वाक्य ९० च्या दशकात जन्मलेल्या प्रत्येकाला पाठ असतील. छोट्या पडद्यावर २० वर्ष गाजलेली हिंदी कथाबाह्य मालिका सीआयडी (CID) आजही प्रेक्षकांना तितकीच आवडते. आणि यातील एसीपी प्रद्युम्न, दया आणि अभिजित ही तिघडी (CID) म्हणजे प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईतच आहे. आता पुन्हा एकदा प्रेक्षकांना दया आणि अभिजीतची अर्थात आदित्य श्रीवास्तव आणि दयानंद शेट्टी ही जोडगोळी पुन्हा एकदा एकत्र झळकणार आहे.
१९९८ सालापासून या मालिकेने केवळ टीआरपीच नव्हे तर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य देखील गाजवले. क्राईम, थ्रिलर आणि सस्पेन्स या तीनही घटकांचे एकत्रित मिश्रण म्हणजे सीआयडी ही मालिका होती. यातील दया आणि अभिजीत यांची मैत्री ही खरचं मनाला भावणारी होती.
 
 

cid  
 
सीआयडी मालिकेतील एसीपी प्रद्युमन, दया, अभिजीत, फ्रेडी, डॉक्टर साळुंखे, डॉ तारिका या सर्व व्यक्तिरेखा आजही लोकप्रिय आहेत. आता इतक्या वर्षांनी एकत्र येत दया आणि अभिजीत अर्थात आदित्य हे कोणत्याही आरोपीच्या शोधात नसणार आहेत. तर ते एका ट्रॅव्हल शोच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहेत. याबद्ल आदित्यने माहिती देत म्हटले की, सीआयडीची जुनी टीम एका ट्रॅ्व्हल शोच्या माध्यातून पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंज करण्यासाठी येणार आहे. आम्ही मे महिन्यात हा शो युट्युबवर लाँच करण्याच्या तयारीत आहोत. या शोमध्ये प्रवासातील गमतीजमती, गोष्टी, खाण-पिणं असा अनुभव प्रेक्षकांना मिळणार असून यासाठी आम्ही साताऱ्यात शुट केलं असून पुढची आमची स्वारी गोव्यात जाणार आहे”.
 
पुढे आदित्य श्रीवास्तव असे देखील म्हणाले की, सीआयडीच्या संपुर्ण टीमला पुन्हा एकदा अॅक्शनमध्ये पाहण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत, याची आम्हाला कल्पना असल्यामुळे आम्ही हा शो त्यांच्या भेटीला घेऊन आलो आहोत”. याशिवाय लवकरच आदित्य आणि दयानंद हे दोघेही आगामी चित्रपटातही एकत्र झळकणार असल्याची माहिती देखील समोर येत असून या चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच संपले असल्याचे आदित्यने सांगितले.